Breaking News

सोशल मीडियावरून थेट जंतर-मंतर... काय आहे 'कॉकरोच जनता पार्टी'चा प्रहार?

सोशल मीडियावरून थेट जंतर-मंतर... काय आहे 'कॉकरोच जनता पार्टी'चा प्रहार?

आज ६ जून... आणि या घडीची सर्वात मोठी बातमी थेट देशाची राजधानी दिल्लीतून येत आहे! दिल्लीचं ऐतिहासिक जंतर-मंतर मैदान आज हजारो तरुणांच्या आक्रोशाने आणि एका अनोख्या सुशिक्षित एल्गाराने हादरून गेलं आहे. निमित्त आहे, सध्या देशभरात प्रचंड वादळ निर्माण करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजेच CJP चं पहिलं भव्य जनआंदोलन!


आणि आता ही लढाई सोशल मीडियावरून थेट रस्त्यावर उतरली आहे. आज सकाळीच अमेरिकेतून थेट दिल्ली विमानतळावर दाखल झालेल्या अभिजित दीपकेचे स्वागत करायला मीडियाचे कॅमेरे सज्ज होते. विशेष म्हणजे, कोणत्याही अटकेच्या भीतीला न जुमानता हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र घेऊन अभिजित विमानतळाबाहेर पडला, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, 'नीट' (NEET) मधील कथित पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आज दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर CJP चे पहिले मोठे आणि अनोखे शांततापूर्ण आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी उपरोधिकपणे 'कॉकरोच मास्क' (झुरळांचे मुखवटे) परिधान केले आहेत. हातात 'एक पुस्तक आणि तिरंगा' घेऊन आलेल्या या सुशिक्षित तरुणांनी तिथे तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांना चक्क गुलाबाची फुले देऊन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.आणि  हजारो तरुण आज रस्त्यावर उतरले आहेत 


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि NEET पेपरफुटीच्या भ्रष्ट सिस्टीमवर थेट 'प्रहार' करण्यासाठी हा सुशिक्षित युवा वर्ग आज दिल्लीत ठाम उभा आहे.

पण... एका सोशल मीडिया पेजवरून सुरू झालेली ही मोहीम, आज थेट दिल्लीच्या रस्त्यांवर जनआंदोलन बनून का धडकली? या तरुणांना रस्त्यावर उतरायला कोणी भाग पाडलं?

तर याला कारणीभूत आहे देशाच्या व्यवस्थेकडून झालेला तरुणांचा घोर अपमान! 'तरुण हे झुरळांसारखे आहेत... ते फक्त सोशल मीडिया आणि RTI च्या माध्यमातून लोकांवर टीका करत फिरतात!'... जेव्हा एका सर्वोच्च न्यायमूर्तींकडून देशाच्या तरुण पिढीला अशी उपमा दिली जाते, तेव्हा संतापाचा उद्रेक होणं साहजिकच होतं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी या तरुणांनी दगड-धोंडे हातात घेतले नाहीत, तर चक्क 'कॉकरोच जनता पार्टी' स्थापन करून व्यवस्थेलाच उपरोधिक आरसा दाखवला! पाहुयात, सोशल मीडियाच्या 'एक्स' अकाऊंटवर बॅन आणण्यापासून ते थेट जंतर-मंतर हादरवणाऱ्या या 'कॉकरोच जनता पार्टी'चा संपूर्ण प्रवास... आमचा हा विशेष रिपोर्ट..."


देशातील तरुणांना 'झुरळ' म्हणणाऱ्या विधानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेणाऱ्या, आणि मूळच्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या ३० वर्षीय अभिजित दीपके या तरुणाने थेट 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ची स्थापना केली. सुरुवातीला हा केवळ एक उपरोधिक टोला किंवा एक 'मीम पेज' होतं. पण बेरोजगारी, पेपरफुटी आणि व्यवस्थेविरोधातील तरुण पिढीचा संताप यामुळे या पेजला अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळाले. लोकप्रियता इतकी वाढली की या पेजने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांनाही फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकले. परिणामी, या पार्टीचे 'एक्स' (ट्विटर) खाते भारतात बॅन करण्यात आले, पण काही वेळातच 'कॉकरोच इज बॅक' नावाने नवीन खाते सुरू करून तरुणांनी त्याला पुन्हा प्रचंड प्रतिसाद दिला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अनोख्या आंदोलनाला देशातील दिग्गज विचारवंत आणि नेत्यांचा पाठिंबा मिळतो आहे. प्रख्यात पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आजच्या ६ जूनच्या आंदोलनाबाबत आधीच इशारा दिला होता की, जर ५ जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर या आंदोलनात ते स्वतः सहभागी होतील. याशिवाय पुण्याचे प्रसिद्ध वकील अ‍ॅड. असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे.

या आंदोलनाची धुरा सांभाळण्यासाठी अभिजित दीपकेसोबत तीन प्रमुख प्रवक्ते मैदानात उतरले आहेत. यामध्ये शोध पत्रकार सौरव दास, 'पॉवर ऑफ युनिट्स' पुस्तकाच्या लेखिका विजेता दहिया, आणि IIT कानपूर व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांचा समावेश आहे. या उच्चशिक्षित तरुणांच्या नेतृत्वामुळे हे आंदोलन आता फक्त एक सोशल मीडिया ट्रेंड राहिलेलं नाही, तर तो व्यवस्थेविरुद्धचा एक सुशिक्षित एल्गार बनला आहे.


"तरुणांना 'झुरळ' समजून कचऱ्यात फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थेला आज याच तरुणांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आपली ताकद दाखवून दिली आहे. आज जंतर-मंतरवर जमा झालीली गर्दी, ही फक्त एका सोशल मीडिया पेजच्या आवाहनावर आलेली गर्दी नाही; तर तो देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या आणि भ्रष्टाचाराच्या सिस्टीमवर लागलेला थेट 'प्रहार' आहे! जेव्हा हातात बंदूक किंवा दगड न घेता, एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात बाबासाहेबांचे पुस्तक घेऊन उच्चशिक्षित तरुण रस्त्यावर उतरतात, पोलिसांना गुलाब देऊन शांततेत प्रश्न विचारतात, तेव्हा सत्ताधाऱ्यांनी समजावं की ,तरुण पिढीचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. जर सोनम वांगचुक आणि असीम सरोदे यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी या तरुणांच्या पाठीशी उभी राहत असतील, तर सरकारला आता या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या प्रश्नांची आणि NEET च्या पेपरफुटीची उत्तरे द्यावीच लागतील.


फक्त सोशल मीडियावरील खाती 'बॅन' करून किंवा आवाज दाबून तरुणांचा संताप शांत करता येणार नाही, हे आता दिल्लीच्या रस्त्यांवरून स्पष्ट झालं आहे. भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीच्या रॅकेटवर सरकार आता तरी कायमचा 'प्रहार' करणार की तरुणांचा हा आक्रोश असाच वाढत जाणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.



Most Popular News of this Week

बातम्या गावाकडच्या || News Marathi 24x7

बातम्या गावाकडच्या || News Marathi 24x7 #marathinews #newsmarathi #news24marathi #newsmarathi24x7

चोपडा तालुक्यात वादळी...

चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी पिकांचे मोठे नुकसान, विजेचे...

हातभट्टी दारूमुळे मृत्यू...

हातभट्टी दारूमुळे मृत्यू प्रकरणावर रामदास आठवले संतप्त #marathinews #newsmarathi #news24marathi...

बातमी महाराष्ट्राची |...

बातमी महाराष्ट्राची | महराष्ट्रातील घडामोडींचा आढावा || Batami Maharashtrachi #marathinews #newsmarathi...

वैभव नाईकांच्या टीकेला...

वैभव नाईकांच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचे प्रत्युत्तर #marathinews #newsmarathi #news24marathi...

सोशल मीडियावरून थेट...

आज ६ जून... आणि या घडीची सर्वात मोठी बातमी थेट देशाची राजधानी दिल्लीतून येत...