मित्र प्रेम - प्रेमाला उपमा नसेल ही ! पण सीमा नक्कीच असावी । Crime Zone S01E10 #news24marathi #marathinews #newsmarathi #crimezone आपले स्वागत करते क्राइम झोन कार्यक्रमात. आज आपण बघणार आहोत एका अनोख्या मैत्रीची कहाणी. संकेत, असीम आणि प्राजक्ता तिघांच्या मैत्रीचे बंध कॉलेज पासूनच घट्ट जुळलेले. त्यातल्या त्यात संकेत आणि प्राजक्ताच्या मनात एकमेकांबद्दल खूप प्रेम. अगदी कॉलेज पासूनच आयुष्यभर साथ देण्याची वचनं एकमेकांना दिलेली. असीम त्यांचा एकुलता एक पण जिव्हाळ्याचा मित्र. तिघही जॉबला लागले ते सुद्धा एकत्र. पण फरक इतकाच की असीम आणि प्राजक्ता एकाच कंपनीमध्ये कामाला लागले पण संकेत मात्र दुसरी कडे job ला लागला. संकेत च्या चांगल्या qualification मुळे त्याला तिथे चांगली post हि मिळाली. रोज संध्याकाळी ते एका coffeeshop मध्ये भेटायचे. एकत्र वेळ घालवायचे. नंतर असीमला निरोप दिला की संकेत आणि प्राजक्ता फिरायला जायचे. एकत्र बसून आपल्या चांगल्या भविष्याची planning करायचे.